Advertisement

कोरोना निर्बंधामुळे राणीची बाग महिनाभर बंद

मागील वर्षी २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासून ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत राणी बाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती.

कोरोना निर्बंधामुळे राणीची बाग महिनाभर बंद
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईत अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय (राणीबाग) ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. राणीबाग बंद राहणार असली तरी येथील नूतनीकरणाचे काम सुरूच राहणार आहे, अशी माहिती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

मागील वर्षी २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासून ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत राणी बाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर मुंबईत कोरोनावर नियंत्रण आल्याने १५ फेब्रुवारीपासून राणीबाग पुन्हा सुरू केली. मात्र, आता पुन्हा रुग्णांची संख्या वाढत असल्याने राणीबाग महिनाभर बंद करण्यात आली आहे

उद्यान आणि प्राणिसंग्रहालय एक महिना बंद असले तरी नूतनीकरणाची कामे सुरूच राहणार आहेत. कर्मचारीही नियमितपणे कामावर येत राहणार आहेत. त्यामुळे कोणतेही काम थांबणार नाही. नूतनीकरणादरम्यान, विविध पक्ष्यांच्या पिंजऱ्यांचे काम महिनाभरात पूर्ण होणार आहे. त्यामुळे हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आणखी जोमाने पर्यटकांसाठी नेहमीप्रमाणेच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहणार आहे, असे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या आधी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या १२ हजारांपर्यंत जात होती. मात्र, गेल्या रविवारी अडीच ते तीन हजार पर्यटक राणीबागेत  आले होते. पर्यटकांची संख्या एक लाख ८० हजारांवरून कमी होऊन एक लाखापर्यंत आली आहे. १५ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत या महिनाभराच्या कालावधीत केवळ ४१ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.  हेही वाचा -

लोकलमध्ये विनामास्क प्रवास केल्यास ५०० रुपयांचा दंड

महापालिका कार्यालयांत आरटीपीसीआर चाचणीशिवाय नागरिकांना प्रवेश बंदी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा