Advertisement

हॉटेलचे साडेआठ कोटींचे थकित शुल्क माफ केल्याचा पालिकेवर आरोप

ताज हॉटेलवर मुंबई महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना मेहेरबान असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

हॉटेलचे साडेआठ कोटींचे थकित शुल्क माफ केल्याचा पालिकेवर आरोप
SHARES

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया इथल्या ताज हॉटेलवर मुंबई महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना मेहेरबान असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. 

२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव गेली १२ वर्षे हॉटेल भोवतीचा फूटपाथ आणि रस्त्याचा काही भाग ताज हॉटेल वापरत आहे. 

मात्र हा रस्ता आणि फूटपाथ वापराबद्दलचे सुमारे साडेआठ कोटी रुपयांचे शुल्क थकले होते. मात्र हे थकीत शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

तसंच यापुढील काळात फूटपाथ वापराचे १०० टक्के आणि रस्तावापराचे ५० टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. रस्त्याची ८६९ चौरस मीटरची जागा आणि फूटपथाची ११३६.३ चौरस मीटरची जागा ताज हॉटेलनं बॅरिकेट्स टाकून अडवली आहे.

स्थायी समितीत या प्रस्तावाला भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीनं विरोध करत यावर बोलण्याची मागणी केली. पण स्थायी समिती अध्यक्षांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावत हा प्रस्ताव पास केला.

एकीकडे सामान्य जनतेला एक पैशाचीही शुल्कमाफी मिळत नाही. तर दुसरीकडे मात्र फाईव्ह स्टार हॉटेल असलेल्या ताजला मात्र कोट्यवधींची शुल्कमाफी मिळते. या कारणावरून विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन पालिकेनं केल्यानं लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा

थर्टीफस्टला मद्यपान करून गाडी चालवल्यास होणार रक्त तपासणी

भुईगाव बीचजवळ समुद्रात तरंगताना दिसली कार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा