Advertisement

इंग्रजीतील विकास आराखड्याची शिवसेनेकडून होळी


इंग्रजीतील विकास आराखड्याची शिवसेनेकडून होळी
SHARES

मुंबई महानगर पालिकेकडून २०१४-३४ चा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पण राज्य सरकारकडून या विकास आराखडाच्या प्रती मराठीत नव्हे तर इंग्रजीत छापण्यात आल्या आहेत. शिवसेनेने याचा विरोध करत रविवारी कुर्ला-साकीनाका येथील शिवाजी मैदानावर इंग्रजी विकास आराखड्याची होळी केली. याअगोदरही शनिवारीही कुर्ला-चांदिवली परिसरात आराखड्याची होळी केली होती.


मुख्यमंत्र्यांचा वचक नाही

पालिकेसह सर्व सरकारी यंत्रणांमध्ये मराठी बंधनकारक अाहे. मात्र, विकास आराखड्याची प्रत  इंग्रजीत असल्यानं सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.  मराठीला विसरत इंग्रजीचा उदो उदो करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांचा वचक नसल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पालिकेतील नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत इंग्रजीतील विकास आराखड्याला विरोध करत त्याविरोधात जोरदार आंदोलन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.  त्यानुसार रविवारी कुर्ला-साकीनाका येथील शिवाजी मैदानावर इंग्रजी विकास आराखड्याची होळी करण्यात आल्याची माहिती पालिकेतील सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांनी दिली. 


मुंबईकरांच्या भावना दुखावल्या

मराठीएेवजी इंग्रजीत विकास आराखड्याची प्रत छापत अधिकाऱ्यांनी मुंबईकरांच्या भावना दुखावल्या, असा आरोप करत लांडे यांनी मराठीत प्रती छापण्याची मागणी केली.  तर मराठीला बाजूला सारून इंग्रजीला महत्त्व देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही लांडे यांनी केली आहे.



हेही वाचा -

पालघरच्या केळवे समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू

मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पाला 'गती'



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा