Advertisement

मुंबईत स्वतंत्र मनोरुग्णालय बांधण्याची शिवसेनेची मागणी

शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे मानसिक रुग्णांवर स्वतंत्र उपचार करण्यासाठी मुंबईत महापालिकेने सोयीच्या ठिकाणी मनोरुग्णालय उभारण्याची मागणी केली आहे. मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयात मानसोपचार विभागामार्फत मानसिक आजारांवर उपचार केला जात असला तरी या सुविधा कमी पडत असल्याचं म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

मुंबईत स्वतंत्र मनोरुग्णालय बांधण्याची शिवसेनेची मागणी
SHARES

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून मनोविकाराच्या आजारांच्या रुग्णामध्ये वाढ होत आहे. या वाढत्या आजाराचं गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने मानसिक विकाराच्या आजारांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय बांधण्याची मागणी शिवसेनेकडून होत आहे.

कुणी केली मागणी?

शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे मानसिक रुग्णांवर स्वतंत्र उपचार करण्यासाठी मुंबईत महापालिकेने सोयीच्या ठिकाणी मनोरुग्णालय उभारण्याची मागणी केली आहे. मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयात मानसोपचार विभागामार्फत मानसिक आजारांवर उपचार केला जात असला तरी या सुविधा कमी पडत असल्याचं म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

कारण काय?

धावपळ आणि धकाधकीचं जीवन, वाढतं प्रदूषण, नोकरी- धंद्यातील ताणतणाव, जंक फूड अति खाणं, इत्यादी अनेक कारणांमुळे मुंबईतील नागरिक, शाळकरी मुले, महाविद्यालयिन विद्यार्थी मानसिक आजारांना बळी पडत आहेत. परिणामी फोबिया, डिप्रेशन, स्क्रीझोफेनिया, अल्झायमर अशा विविध मानसिक व्याधीग्रस्तांची संख्या वाढत आहे. असे आजार योग्य अशा मानसोपचाराने बरे होऊ शकतात. त्यामुळे महापालिकेने स्वतंत्र मनोरुग्णालय बांधल्यास रुग्णांना उपचार घेणं सुलभ होईल, असं म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा-

धक्कादायक: घरगुती मिठामध्ये प्लॅस्टिकचे कण; आयआयटीचं संशोधन

मिठी नदीचं शुद्धीकरण: पहिल्या टप्प्यात २११ कोटींचा खर्च

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा