Advertisement

शिवसेनेला बेस्ट वाचवायचीय की बुडवायची?

दादर रेल्वे स्टेशन ते चैत्यभूमी(शिवाजी) शेअर टॅक्सी स्टँडचं उद्घाटन शिवसेना विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर यांच्या हस्ते शुक्रवारी ४ मे रोजी झालं. शिवसेनाप्रणित महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या माध्यमातून हे शेअर टॅक्सी स्टँड सुरु करण्यात आलं आहे. एका बाजूला बेस्ट उपक्रमांच्या महसुलात वाढ होण्याची आवश्यकता असताना शिवसेनेच्या आमदारांसह नगरसेवकांनी केवळ परप्रांतियांची पोटं भरावीत म्हणून त्यांना शेअर टॅक्सी स्टँडचा आसरा उपलब्ध करून दिल्याची चर्चा सुरू आहे.

शिवसेनेला बेस्ट वाचवायचीय की बुडवायची?
SHARES

बेस्ट उपक्रम तोट्यात चालत आहे. यासाठी बेस्टची बस सेवा अधिक सक्षम बनवण्यासाठी शेअर रिक्षा व टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी होत आहे. एका बाजूला ही मागणी होत असताना दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेकडून शेअर टॅक्सीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे. दादर रेल्वे स्टेशन ते चैत्यभूमी या मार्गावर बेस्टची बस सुरु असतानाच शिवसेनेनेच आता या मार्गावर शेअर टॅक्सी सुरु केली आहे. त्यामुळे शिवसेनेला बेस्ट उपक्रम वाचवायचा की बुडवायचा आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेअर टॅक्सी स्टँडचं उद्घाटन

दादर रेल्वे स्टेशन ते चैत्यभूमी(शिवाजी) शेअर टॅक्सी स्टँडचं उद्घाटन शिवसेना विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर यांच्या हस्ते शुक्रवारी ४ मे रोजी झालं. शिवसेनाप्रणित महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या माध्यमातून हे शेअर टॅक्सी स्टँड सुरु करण्यात आलं आहे. एका बाजूला बेस्ट उपक्रमांच्या महसुलात वाढ होण्याची आवश्यकता असताना शिवसेनेच्या आमदारांसह नगरसेवकांनी केवळ परप्रांतियांची पोटं भरावीत म्हणून त्यांना शेअर टॅक्सी स्टँडचा आसरा उपलब्ध करून दिल्याची चर्चा सुरू आहे.

मिनी बस का नाही?

दादर रेल्वे स्थानकापासून ते कोळीवाडा आणि नेहरू सेंटर आदी ठिकाणच्या प्रवासासाठी एन.सी. केळकर मार्गावर बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून रानडे मार्गावर सुरु केलेल्या टॅक्सी स्टँडच्या ऐवजी मिनी बस सेवा उपलब्ध करून दिली असती तर बेस्टच्या उत्पन्नातही वाढ झाली असती. परंतु बेस्टच्या उत्पन्नापेक्षा संघटनेला मजबूत करून परप्रांतियांचे खिसे भरत बेस्टला संपवण्याचे काम शिवसेनेकडून होत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

बेस्टला उध्वस्त करण्याचं काम

मनसेचे माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी या स्टँडचा तीव्र निषेध केला आहे. बेस्ट उपक्रम तोट्यात असल्याने त्याला आर्थिक सक्षम बनवणं ही सर्वांची गरज आहे. यासाठी सत्ताधारी शिवसेनेने बेस्टला आर्थिक मदत करायला हवी. परंतु ती मदत न करता शेअर टॅक्सी स्टँड सुरु करत एकप्रकारे बेस्टला उध्वस्त करण्याचं काम शिवसेना करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

बेस्ट वाचवायची नाहीच

दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी या मार्गावर सकाळ आणि संध्याकाळ या कालावधीत कबुतर खान्याजवळून बस सोडली जाते. ही बस सेवा नफ्यात आहे. परंतु शिवसेनेने या मार्गावर शेअर टँक्सी स्टँड रानडे मार्गावर सुरु करून बेस्ट बस सेवा डब्यात घालण्याचं पाप करत असल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. याठिकाणी जर त्यांनी बस सेवा उपलब्ध करून दिली असती तर त्यांना बेस्टची चिंता आहे, असं आम्ही मानलं असतं. परंतु त्यांना बेस्टला वाचवायचं नाही तर गाळात ढकलायची आहे, हे स्पष्ट होतं, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा-

तरीही शिवसेना म्हणते 'करू द्या मोफत बस प्रवास'

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांकडून ओळखपत्राचा दुरुपयोग

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा