Advertisement

हॉटेल, रेस्टॉरंटमधली स्वच्छतागृह सार्वजनिक होणार ?


हॉटेल, रेस्टॉरंटमधली स्वच्छतागृह सार्वजनिक होणार ?
SHARES

मुंबई - दक्षिण दिल्ली नगरपालिकेने एक नवा नियम अंमलात आणला आहे. या नियमानुसार खासगी हॉटेल आणि रेस्टॉरंटचं स्वच्छतागृह सामान्य नागरिकांनाही वापरता येणार आहे. 'पे अॅण्ड यूज’ यानुसार ही स्वच्छतागृह वापरता येणार आहे. त्यामुळे आता दिल्लीनंतर मुंबईतही हा नियम लागू करावा अशी मागणी होताना दिसतेय.

मुंबईत स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. स्वच्छतागृहांची संख्या पाहता महिलांसाठी खूप कमी स्वच्छतागृह आहेत. 2011 मध्ये आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत पुरूषांसाठी 2 हजार 849 मोफत स्वच्छतागृह आहेत. तर, महिलांसाठी एकही मोफत स्वच्छतागृह नाही. ‘राईट टू पी’ या महिलांसाठी काम करणाऱ्या चळवळीच्या कार्यकर्त्या मुमताझ शेख यांनी मात्र या निर्णयाला विरोध केलाय. असा निर्णय मुंबईत लागू करण्यात आला, तर त्या निर्णयाचा विरोध करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

खासगी हॉटेल आणि रेस्टॉरंटचं स्वच्छतागृह वापरण्यापेक्षा महापालिकेने महिलांसाठी सार्वजिनक स्वच्छतागृह बांधावीत अशी त्यांची मागणी आहे. तर, या निर्णयाला हॉटेल व्यवसायिकांनीही मात्र नाक मुरडलंय. हॉटेल व्यवसायिक कमलाकर शेणॉय यांनी या मागणीवर नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांसाठी स्वच्छतागृह सुरु करणं ही सरकारची जबाबदारी आहे. वाटसरुंना स्वच्छतागृहं उपलब्ध करुन दिल्यानंतर आमच्या गिऱ्हाईकांची गैरसोय होईल. शिवाय स्वच्छतेचा प्रश्नसुद्धा निर्माण होईल. हॉटेल्स, रेस्टॉरंटमधली स्वच्छतागृहं उपलब्ध करुन देण्याची मागणी करणारे त्यांच्या ऑफिसेस किंवा घरातली स्वच्छतागृह शुल्क घेऊन कुणाला उपलब्ध करुन देतील का?’ असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा