सिद्धिविनायकाचं दर्शन बंद!

 Dadar (w)
सिद्धिविनायकाचं दर्शन बंद!
Dadar (w), Mumbai  -  

प्रभादेवी - पुढचे काही दिवस गणेश भक्तांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार नाही. कारण येत्या 18 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस भाविकांना बाप्पांचं दर्शन घेता येणार नाही. पण, भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रतिमूर्ती ठेवण्यात येणार आहे. 23 जानेवारीला आरती आणि पूजा झाली की भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन घेता येईल.

Loading Comments