Advertisement

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट 100 कोटींची इमारत खरेदी करणार

शिर्डीमधील साईबाबा मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी प्लॅन तयार करण्यात येत आहे.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट 100 कोटींची इमारत खरेदी करणार
SHARES

मुंबईमधील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने मंदिराच्या विस्ताराचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेजारी असणारी तीन मजली राम मॅन्शन ही इमारत तब्बल 100 कोटी रूपयांना खरेदी करणार आहे.

शिर्डीमधील साईबाबा मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी प्लॅन तयार करण्यात येत आहे. रांगेची समस्या सोडवण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराने इमारत खरेदीचा निर्णय घेतला. त्यासाठी ट्रस्टकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

मंदिर ट्रस्टने खरेदीसाठी सिद्धिविनायक कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी चर्चा सुरू केली आहे. जागेमुळे मंदिराला एकूण 1,800 चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. त्या जागेवर भक्तांसाठी अनेक सोयी-सुविधा करण्यात येणार येतील.

टाईम्स ऑफ इंडियाने सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन कुमार त्रिपाठी यांच्या हवाल्याने 100 कोटींच्या खरेदीचे वृत्त दिले आहे.

त्रिपाठी म्हणाले की, मंदिराच्या जवळील राम मॅन्शन इमारत खरेदी अंतिम टप्प्यात आहे. सिद्धिविनायक सोसायटीशीही चर्चा सुरू आहे. या अतिरिक्त जागेमुळे मंदिराची पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी उपक्रमांना मोठी चालना मिळेल.

दरम्यान, राम मॅन्शन ही इमारत काही वर्षांपूर्वी जुन्या चाळीच्या जागेवर बांधली आहे. या इमारतीत 20 छोटे 1 BHK फ्लॅट आहेत. या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर मालक राहतो. त्याने आपल्या खोल्या या रेंटवर दिल्या आहेत, अशी माहिती मिळत आहे.

सिद्धिविनायक मंदिराच्या जवळील राम मॅन्शन ही इमारत 708 चौरस मीटर इतक्या जागेवर आहे. या इमारतीचे गेट (प्रवेशद्वार) हे सिद्धिविनायक सोसायटी मंदिराच्या ट्रस्टच्या अगदी समोरच आहे. जागांच्या एकत्रीकरणामुळे शिर्डीमधील साईबाबा मंदिरासारखा दर्शन रांग कॉम्प्लेक्स उभारता येऊ शकते, असे मंदिर प्रशासनाने सांगितले.



हेही वाचा

35 तासांच्या विलंबानंतर लालबागचा राजाचे विसर्जन

प्रताप सरनाईक मुंबईत टेस्लाचे पहिले मालक बनले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा