Advertisement

पालिकेच्या विरोधात मुंबईकरांचा निषेध मोर्चा


पालिकेच्या विरोधात मुंबईकरांचा निषेध मोर्चा
SHARES

सीएसटी - मुंबई महापालिकेविरोधात मुंबईकरांनी एकत्र येत शांततापूर्ण मुक निषेध मोर्चा काढला. रस्त्यांवरील खड्डे,वाहतूककोंडी आणि विविध सेवा देण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. या निषेध मूक मोर्चात मुंबईकरांसह 12 स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.
मुंबईकरांनी फलकांच्या माध्यमातून विविध घोषणा करत महपालिकेचा निषेध केला. पालिकेतील इंजिनिअर्सनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर हे एकप्रकारे प्रशासन चांगले असावे, ही अपेक्षा बाळगणाऱ्या मुंबईकरासांठी चपराक आहे, असे फ्री अ बिलियन या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा अपर्णा सुदर्शन यांनी म्हटले. बदलत असलेल्या मुंबईत धोरणात्मक आणि कायदयात्मक बदल आवश्यक असल्याचे स्वयंसेविका सुजाता देशपांडे यांनी म्हटले. आझाद मैदानात दिवसभर हा मोर्चा सुरु राहणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा