Advertisement

पापलेट महाराष्ट्राचा 'राज्य मासा'! राज्य सरकारची घोषणा

खवय्य्यांच्या आवडीच्या माशाला आजा राज्य दर्जा मिळाला आहे

पापलेट महाराष्ट्राचा 'राज्य मासा'! राज्य सरकारची घोषणा
SHARES

राज्य मासा म्हणून खवय्यांच्या ताटात महत्त्वाचं मान मिळवणाऱ्या एका माशाला दर्जा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने सोमवारी ही घोषणा केली आहे. खोल समुद्रात मिळणारा रुपेरी पापलेट मासा आता राज्य मासा म्हणून ओळखला जाणार आहे. 

सिल्व्हर पॉम्पलेट अर्थात पापलेट माशाला महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून दर्जा मिळाला आहे.  मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून पापलेट माशाला राज्य मासा म्हणून अधिकृत दर्जा मिळावा यासाठी मागणी केली जात होती. अनेक मच्छिमार संस्थानी मत्स्य व्यवसाय मंत्र्यांकडे यासंबंधित मागणी केली होती. अखेर ही मागणी मान्य झाल्याने मच्छिमारांनी समाधान व्यक्त केले आहे. 

पापलेट हा महाराष्ट्रातील सर्वाधिक निर्यात होणारा मासा आहे. महाराष्ट्रात १९८०पासून त्याचे उत्पादन घटत आहे. व्यापारपद्धतीत झालेल्या बदलाचा पापलेटला फटका बसत आहे. मासेमारी पद्धतीमध्येही झालेल्या बदलांमुळे नुकसान झाले आहे. 

राज्यात सिल्व्हर पॉम्फ्रेटच्या उत्पादनात होत असणारी घट ही चिंताजनक आहे. त्यामुळं या प्रजातीचे जतन करण्याच्या दृष्टीने मच्छिमार संघटनांनी ही मागणी उचलून धरली होती.

राज्य सरकारने या मत्स्य प्रजातीचे महत्त्व जाणून टपाल तिकिटही जारी केले आहे. माशाला अधिकृत राज्य माशाचा दर्जा मिळाल्यानंतर या प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण होण्यास मदत मिळेल, अशी भावना मच्छिमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 


हेही वाचा

पुढील 3 दिवस पावसाचे, मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा