दादरमध्ये अघोरी विद्येचा खेळ?

दादर - दादरच्या कै.भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीची दुरवस्था झालीय. या स्मशानभूमीत कवट्या, हाडांचे सांगाडे मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. त्यामुळे या स्मशानभूमीत अघोरी कृत्य सुरू नाही ना असा प्रश्न या दृश्यांवरुन पडला आहे. कधीकाळी दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्याच बालेकिल्ल्यात पुन्हा शिरकाव करण्याचा पूर्ण प्रयत्न यंदाच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा असेल. पण, दादरमधल्या या भयानक वास्तवाकडे सत्ताधाऱ्यांचं मात्र दुर्लक्षच झालेलं दिसतंय. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांचा हा वॉर्ड आहे. मात्र त्यांचंही या प्रकाराकडे लक्ष असल्याचं दिसत नाही. त्यामुळे दादरच्या स्मशानभूमीतली ही धक्कादायक दृश्य नक्कीच विचार करायला लावणारी आहेत, मुंबईकरांना आणि सत्ताधाऱ्यांनाही.

Loading Comments