पालिका शाळेचा स्लॅब कोसळला

 Malad
पालिका शाळेचा स्लॅब कोसळला
पालिका शाळेचा स्लॅब कोसळला
पालिका शाळेचा स्लॅब कोसळला
पालिका शाळेचा स्लॅब कोसळला
See all

मालाड - एस. व्ही. रोड येथील महापालिका शाळेत स्लॅब कोसळण्याची घटना पुन्हा एकदा घडली. गुरुवारी शाळेच्या  इमारतीमधील बाथरुमचा स्लॅब कोसळला. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. पण या घटनेमुळे शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

  महिन्याभरापूर्वीच या शाळेत डोक्यावर स्लॅब कोसळून एक शिक्षक जखमी झाला होता.  शाळेची अद्याप डागडुजी करण्यात न आल्यामुळे वारंवार हा प्रकार घडत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष चिकणे यांनी सांगितले. 

Loading Comments