Advertisement

शिवडीत नागाच्या दंशामुळं सर्पमित्राचा मृत्यू

मुंबईतील शिवडी कोळीवाड्यातील एका घरात शिरलेल्या नागाला सर्पमित्र त्या नागाला पकडत असताना नागानं दंश केल्यानं सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शिवडीत नागाच्या दंशामुळं सर्पमित्राचा मृत्यू
SHARES

मुंबईतील शिवडी कोळीवाड्यातील एका घरात शिरलेल्या नागाला पकडत असताना सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजू सोलंकी (२०) असं या सर्पमित्राचं नाव आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेनंतर सर्पमित्र राजू यांला केईएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.


बोटावर दंश 

शिवडी परिसरात राहणाऱ्या शाहनबाज शेख यांच्या घरी हा नाग शिरला होता. हा नाग पाहताच सर्पमित्राला त्यांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर या नागाला पकडण्यासाठी सर्पमित्र राजू सोलंकी घटनास्थळी दाखल झाला. नागाला सुखरूप पकडण्यात त्याला यश आलं. मात्र, पकडलेला नाग प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये भरत असताना नागाने उलट्या दिशेनं फिरून राजूच्या उजव्या हाताच्या बोटावर दंश केला.


चूक पडली महागात

नागानं दंश केल्यानंतर देखील राजूने हातातलं काम सोडलं नाही. पकडलेलं नागाचं छोटं पिल्लू असल्यानं आपल्याला काही होणार नाही, अशा भ्रमात राहिलेल्या राजूला ही चूक खूपचं महागात पडली. दंश झालेला त्यांचा हात सुजला आणि त्यानंतर विष शरीरात भिनत गेलं. त्यावेळी त्याला तातडीनं केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.



हेही वाचा -

'डेक्कन क्वीन'चा प्रवास होणार आणखी लवकर

मेट्रोचे तिकीट मिळणार डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा