जागा सोसायटीची की फेरीवाल्यांची?

  Masjid Bandar
  जागा सोसायटीची की फेरीवाल्यांची?
  मुंबई  -  

  मस्जिद - गेल्या आठवड्याभरापासून आर एम स्ट्रीट भागातील विघ्नहर्ता सोसायटीच्या आवारात फेरीवाल्यांचे सामान या भागात आढळून येत आहे. या म्हाडा इमारतीच्या आवारात फेरीवाल्यांचे सामान ठेवण्यावर बंदी असली तरी या भागात फेरीवाले सर्रासपणे सामान ठेवत आहेत. त्यामुळे सामान ठेवणारे आणि सोसायटी कमिटी या दोघांमध्ये या सामानावरून दररोज वाद होत आहेत. 

  याबाबत वाॅर्डमध्ये तक्रार दाखल करूनसुद्धा अजून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने सोसायटी कमिटीतील सदस्य हतबल झाले आहेत. यासंदर्भात इमारतीतील सरचिटणी आनंद काळे यांच्याशी बोलले असता सदर ठिकाणी सार्वजनिक भागात येत असले तरी इमारतीच्या आवारात हा भाग येतो. त्यामुळे ये-जा करताना अडगळीचा समाना करावा लागतो. तर याबाबत याच इमारतीत राहणारे फेरीवाले राजेंद्र इंगळे यांच्याकडे विचारणा केली असता सदर भाग हा सार्वजनिक असून इथे आमचाच अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.