Advertisement

ठाणे : सोसायटी रहिवाशांचे बिल्डरविरोधात उपोषण

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विट केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

ठाणे : सोसायटी रहिवाशांचे बिल्डरविरोधात उपोषण
SHARES

ठाण्यातील कळवा येथील केशव हाईट इमारतीतील १०० हून अधिक रहिवासी बिल्डरच्या कथित फसवणुकीविरोधात उपोषणाला बसले आहेत. बिल्डरने अनेक सुविधांचे आश्वासन देऊनही त्या दिल्या नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विट केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. व्हिडिओमध्ये, सोसायटीच्या स्टॅक-पार्किंगमधून एक कार पडताना दिसत आहे.

घरे विकताना जाहीर केलेल्या सुविधा न पुरविता रहिवाशांना वाऱ्यावर सोडून देणाऱ्या बिल्डरविरोधात पारसिक नगर(Parsik Nagar) येथील ‘केशव हाईट्स’ या इमारतीमधील रहिवाशी मुलाबाळांसह ९ ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषणाला बसले.

इमारतीमध्ये घर घेणाऱ्यांची संबंधित बिल्डरने फसवणूक केली आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. नंदा साळवी या बिल्डरने इमारतीमधील घरे विकताना रहिवाशांना अनेक सुविधा देण्याची आश्वासने दिली होती. या आश्वासनांच्या माध्यमातून घर खरेदी करणाऱ्यांकडून लाखो रूपये उकळले. मात्र प्रत्यक्षात एकही सुविधा पुरविलेली नाही, असंही रहिवाशांनी म्हटलं.

‘केशव हाईट्स’ या इमारतीच्या मालकीच्या वास्तुदेखील इतर संस्थांना केवळ स्वत:च्या फायद्यासाठी देऊन रहिवाशांची फसवणूक केली आहे. शिवाय, याठिकाणी असलेल्या सुविधा भूखंडाचाही गैरवापर केला आहे. या बिल्डरने सर्व कायदे आणि नियम धाब्यावर बसवून अनेक बदलही केले आहेत. या सर्व गैरप्रकाराला वाचा फोडण्यासाठी केशव हाईट्समधील सर्व रहिवाशी रविवारी इमारतीच्या प्रवेशद्वारावरच उपोषणाला(hunger strike) बसले.

सोसायटीतील रहिवासी 46 वर्षीय संतोष राणे म्हणाले, “पार्किंगची अवस्था अत्यंत वाईट आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी ते बांधण्यात आले. त्यात आग विझवण्याच्या सुविधांचा देखील अभाव आहे.”

याच सोसायटीत राहणाऱ्या ५१ वर्षीय सोनू सोनी यांनी २०१४ मध्ये फ्लॅट बुक केला आणि २०१५ मध्ये त्याचा ताबा मिळाला, तेव्हापासून हा त्रास सुरू झाला. सोनी म्हणाले, "बिल्डरने कचरा उचलण्याची किंवा विल्हेवाट लावण्याची मूलभूत सुविधाही दिली नाही, तरीही त्याने देखभालीसाठी 18 महिन्यांचे आगाऊ पैसे घेतले आहेत. हा प्रकल्प रेरा अंतर्गत येत नसल्याने बिल्डर त्याचा फायदा घेत आहेत.”

बांधकाम व्यावसायिक नंदकुमार साळवी यांनी हिंदुस्थान टाईम्सला माहिती दिली की, “आमचे माजी मंत्री श्री आव्हाड यांनी पोस्ट केलेल्या चित्रामागील खरी कहाणी वेगळी आहे. हे स्टॅक पार्किंग चालवणारे जेवण घेण्यासाठी बाहेर गेले होते, त्याच दरम्यान एका चौकीदाराने गाडीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार एका बाजूला झुकली. मी रहिवाशांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भेटणार आहे आणि वचनबद्धतेनुसार त्यांच्या मागण्या पूर्ण करेन.

मागण्या मान्य न झाल्यास रहिवासी आणखी दिवस उपोषण करणार आहेत.



हेही वाचा

जखमी गोविंदा प्रथमेश सावंतची मृत्यूशी झुंज अपयशी

डोळ्यांच्या आजाराने मुंबईकर हैराण, काय काळजी घ्याल?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा