Advertisement

डोळ्यांच्या आजाराने मुंबईकर हैराण, काय काळजी घ्याल?

अनेक भागात लोकांना याचा सामना करावा लागत आहे.

डोळ्यांच्या आजाराने मुंबईकर हैराण, काय काळजी घ्याल?
SHARES

मुंबईत डोळे येण्याची साथ (Eye Conjunctivitis in Mumbai) आली आहे. डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणं आहेत. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यपणे प्रथम एकाच डोळ्याला होतो. मात्र एक डोळा आल्यानंतर (Eye Conjunctivitis) दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

गेल्या आठवड्यापासून मुंबईत डोळ्यांची साथ पसरू लागली आहे. या प्रकारात डोळ्यांना सूज येते, अशीच काहीशी लक्षणं मुंबईकरांमध्ये दिसून येत आहेत. डोळ्यांवर घरगुती उपाय करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या, असं आवाहन रुग्णांना तज्ज्ञांकडून केलं जात आहे.

डोळ्यांना संसर्ग झाल्यास किंवा डोळ्यांना स्पर्श करणे टाळा, डोळे स्वच्छ पाण्याने वारंवार धुवा, शक्यतो प्रवास टाळा, इतरांपासून दूर राहा, डोळ्यांना हात न लावता रुमाल वापरा. तेलकट पदार्थ खाऊ नका आणि कोणतेही घरगुती क्लिनर वापरू नका. घरगुती उपायांचा अवलंब न करता वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला संसर्ग झालाय कसं ओळखाल?

  • डोळ्यांत सतत काहीतरी गेल्यासारखं वाटत असेल, डोळ्यांतून सतत पाणी येत असेल, डोळे सतत लाल होत असतील, तर ही या संसर्गाची सामान्य लक्षणं आहेत. ही लक्षणं आधी एका डोळ्याला आणि
  • त्यानंतर दुसऱ्या डोळ्याला दिसून येतात.
  • तुमचे डोळे आले तर, डोळ्याच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येऊन लाल दिसतात.
  • डोळ्यांतून चिकट पदार्थ बाहेर येतो.
  • डोळ्यांना खाज येणं, डोळे जड वाटणं, तीव्र प्रकाश डोळ्यांना सहन न होणं
  • डोळे येण्यासोबतच संसर्गामुळे ताप, सर्दी, खोकला या तक्रारीही जाणवतात.

डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?

  • डोळे आल्यास डोळ्यांना हात लावू नये
  • डोळे सतत स्वच्छ पाण्यानं धुवत राहा
  • डोळे येणं हा संसर्गजन्य रोग असल्यानं अशावेळी शक्यतो प्रवास टाळावा
  • कुटुंबीयांपासून दूर राहावं
  • डोळ्यांना हात लावू नये
  • वेगळा रुमाल वापरावा
  • तेलकट खाणं टाळावं
  • काहीही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.



हेही वाचा

मुंबईत 227 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' क्लिनिक सुरू होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा