तर, 'एएलएम'ची नोंदणी रद्द करा!


SHARE

मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांमधील कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी 'स्थानिय परिसर व्यवस्थापन' म्हणजेच 'एएलएम'ची मदत घ्या. या कामात 'एएलएम' मदत करत नसतील, तर त्यांची नोंदणी रद्द करा, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व विभाग कार्यालयांच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत.


'एएलएम' काम करत नसेल तर...  

आयुक्त मेहता यांनी शनिवारी सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, खातेप्रमुख यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत कचऱ्याच्या विल्हेवाटसंदर्भात चर्चा करण्यात आली. स्थानिय परिसर व्यवस्थापन (एएलएम) ही संकल्पना कचरा वर्गीकरणाला गती देण्याच्या हेतूनेच निर्माण करण्यात आली होती. ती यातली पूर्वअटच होती. त्यांचीही या कामात मदत घ्यावी. जे 'एएलएम' कामे करत नाहीत, असे दिसून आल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्यात यावी आणि नवीन 'एएलएम' नेमण्याची प्रक्रिया लगेच सुरू करावी, असे आदेशच आयुक्तांनी दिले आहेत.


नियमानुसार कचरा व्यवस्थापन आवश्यक

मुंबईत सध्या ७१९ 'एएलएम' आहेत. मोठे गृहनिर्माण संकुल, उपहारगृहे यांनी नियमानुसार कचरा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. ज्या गृहनिर्माण संस्था अजूनही याबाबत सहकार्य करायला तयार नाही, त्यांची स्वतंत्र यादी करून सादर करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. 

सर्व सहा आयुक्तांनी येत्या १५ दिवसांत आपापल्या भागातील आस्थापनांना भेटी देऊन त्यांचे नियोजन समजून घ्यावे. येत्या ३ महिन्यांत दरमहा किती आणि कसे काम होईल? याचा अहवाल तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.हेही वाचा - 

कचरा विल्हेवाटीच्या जागांचा भलताच वापर! पालिका करणार कारवाई

कचऱ्यापासून मिळावे स्वातंत्र्य, 'एम्स एएलएम'चा पुढाकारडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
ताज्या बातम्या