Coronavirus cases in Maharashtra: 212Mumbai: 85Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 14Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 8Total Discharged: 35BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

मुंबईकरांसाठी 'वाघिणी'चं दूध!

गुजरातमधून ५९४४० अहमदाबाद-मुंबई सेंट्रल या पॅसेंजर ट्रेनमधून दूध आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पश्चिम रेल्वेने देखील परवानगी दिली आहे.

मुंबईकरांसाठी 'वाघिणी'चं दूध!
SHARE

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेली दूधकोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने पश्चिम रेल्वेची मदत घेण्याचं ठरवलं आहे. मुंबईतील दुधाचा प्रश्न तीव्र होऊ नये यासाठी राज्य सरकार सध्या वेगवेगळी शक्कल लढवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुजरातमधून ५९४४० अहमदाबाद-मुंबई सेंट्रल पॅसेंजरच्या वाघिणी (वॅगन) मधून दूध आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पश्चिम रेल्वेने देखील परवानगी दिली आहे.


'अशी' केली दूधकोंडी

राज्य सरकारने मुंबई-अहमदाबाद मार्गे गुजरातमधून २५ टँकरच्या माध्यमातून दूध मुंबईत आणण्याचा केलेला प्रयत्न सकाळी आंदोलनकर्त्यांनी हाणून पाडला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी स्वत: रस्त्यावर उतरून हे टँकर अडवले. यामुळे मागील २ दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन आणखीनच चिघळलं आहे.


 

४४ हजार लिटरचा एक कंटेनर

या पॅसेंजर ट्रेनला प्रत्येकी ४४ हजार लिटर क्षमतेचे कंटेनर जोडण्यात येतील. असे एकूण १२ कंटेनर या ट्रेनला जोडून गुजरातमधून मुंबईत दूध आणण्यात येणार आहे. मुंबईकरांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतल्याचं पश्चिम रेल्वेने ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.हेही वाचा-

दुधाच्या टँकरला पोलिसांचं संरक्षण

दूधकाेंडी आंदोलन गुजरातच्या सीमेवर, २५ टँकर अडवलेसंबंधित विषय
ताज्या बातम्या