...इथले कर्मचारी करतात खादीचा वापर!

 Kandivali
...इथले कर्मचारी करतात खादीचा वापर!

आपल्या मातीशी एकरुप होता यावे आणि स्वदेशी खादी उद्योगाला चालना मिळावी या हेतूने कांदिवलीच्या आर दक्षिण पालिका विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने स्वेच्छेने खादी कपड्यांचा वापर सुरू केला आहे.दर गुरुवारी खादी कपड्यांचा पेहेराव

आर दक्षिण पालिका विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी गेल्या 3 आठवड्यांपासून खादी कपड्यांचा पेहेराव करतात.

खादी कापड कापसापासून बनते, त्यामुळे त्याचे सहज मातीत विघटन होते. खादीची मातीशी जोडलेली नाळ अनुभवता यावी, तसेच खादी उद्योगाचा प्रचार-प्रसार व्हावा आणि उद्योगाला चालना मिळावी यासाठी ही संकल्पना राबवण्यात येत आहे.

आर दक्षिण पालिका विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला ही संकल्पना राबवण्याचे सांगताच सर्वांनी होकार दिला. त्यानंतर गेले 3 आठवडे पालिका विभागात कर्मचारी ते अधिकारी वर्ग खादीच्या पेहेरावात कार्यालयात येत असल्याचे साहेबराव गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा -

विले पार्लेत 'खादी फेस्टिव्हल'


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments