देशी दारू बाळगण्यावर मर्यादा

 Pali Hill
देशी दारू बाळगण्यावर मर्यादा

मुंबई - राज्य सरकारने देशी दारू बाळगणाऱ्यावर मर्यादा आणलीय. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार आता दर महिन्याला देशी दारूचे फक्त 2 युनिट बाळगण्याची परवानगी देण्यात आलीय. राज्यात दारूबंदी कायदा लागू असून वैयक्तिक मद्यसेवन करण्यासाठी परवाना आवश्यक असतो. या परवान्यासाठी वर्षासाठी 100 रुपये आणि आजीवनसाठी 1000 रुपये आकारले जातात. मात्र आता राज्य सरकारनं वैयक्तिक मद्य परवाना मिळणऱ्या देशी दारूवर बंधनं घातलीत.

"परवाना असणाऱ्यांना प्रति महिना 12 युनिट एवढं मद्य विकत घेता येत होतं. मात्र जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अशा प्रकारची बंधनं हवीत असं पत्र संबधीत विभागाला लिहिलं होतं," अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Loading Comments