Advertisement

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी सूचना, हरकती


बाळासाहेबांच्या स्मारकासाठी सूचना, हरकती
SHARES

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा आरक्षित करण्यासाठी विकास योजनेत बदल करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. त्यासाठी बाधित होणाऱ्या व्यक्तींकडून हरकती व सूचना देखील मागविण्यात आल्या आहेत. मात्र केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल खात्याच्या मान्यतेनंतरच आरक्षणातील फेरबदलाला अंतिम मंजुरी देण्यात येईल.

महापौर बंगल्याच्या जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबईच्या विकास योजनेत ही जागा महापौर बंगला यासाठीच आरक्षित आहे. स्मारकासाठी हे आरक्षण बदलणे आवश्यक आहे. या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने महापौर बंगल्याच्या १२ हजार ९२८ चौ.मी. जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याची शिफारस केली आहे.

त्याचबरोबर ही जागा ३० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्वाने 'बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक' या सार्वजनिक न्यासास देण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार महापौर बंगल्याचे आरक्षण बदल्याची प्रक्रिया सुरू करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.

महापौर बंगल्याचे आरक्षण उठवून, त्या जागी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आरक्षण टाकल्यामुळे बाधित होणाऱ्या सर्व व्यक्तींनी एक महिन्याच्या आत हरकती आणि सूचना सादर कराव्यात, असे नगरविकास विभागाने सूचनेत म्हटले आहे

महापौर बंगल्याची जागा किनारा नियमन क्षेत्रात (सीआरझेड) येते. तसेच हरित क्षेत्रात या जागेचा समावेश आहे. आता स्मारकासाठी हरित क्षेत्रातून ही जागा वगळून ती रहिवास क्षेत्रात समाविष्ट करण्यात येणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल खात्याच्या मान्यतेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.



हे देखील वाचा -

महापौरांना निवासस्थान हवंय मलबार हिललाच



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा