Advertisement

आयएनएस विराटचं हाेणार वस्तुसंग्रहालय!


आयएनएस विराटचं हाेणार वस्तुसंग्रहालय!
SHARES

भारतीय नौदलात दैदीप्यमान कारकिर्द झळकावून निवृत्त झालेल्या आयएनएस विराट युद्धनौकेचं वस्तुसंग्रहायलात रूपांतर करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गुरूवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे. त्यानुसार लवकरच आयएनएस विराटचं वस्तुसंग्रहालयात रुपांतर करण्याच्या प्रत्यक्ष कामलाा सुरूवात होण्याची शक्यता आहे.


३० वर्षांनंतर निवृत्त

भारतीय नौदलाची शान अशी आयएनएस विराट या युद्धनौकेची ओळख असून ही युद्धनौका ३० वर्षे सेवा दिल्यानंतर गेल्यावर्षी निवृत्त झाली. या युद्धनौकेचा इतिहास गौरशाली असून या युद्धनौकेचं वस्तुसंग्रहालयात रूपांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यानुसार यासंबंधीच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाल्यानं हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.


युद्धनौकेचे वापर कशासाठी?

प्रस्तावानुसार आयएनएस वस्तुसंग्रहालयात सागरी क्षेत्राशी संबंधित इतिहासाची ओळख करून देणारी दालनं असतील. तर सेलिंग, स्काय डायव्हिंगसारख्या खेळांसाठी या युद्धनौकेचे वापर होणार आहे. त्याचबरोबर सागरी प्रशिक्षणासाठीही जहाजावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.


बीओटी तत्वावर प्रकल्प

आयएनएस विराटचं वस्तुसंग्रहालयात रुपांतर करण्याचा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर राबवण्यात येणार आहे. तर यासाठी ८५२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. महत्त्वाचं म्हणजे या युद्धनौकेचं वस्तुसंग्रहालयात रुपांतर झाल्यानंतर ही नौका सिंधुदुर्ग येथील निवती राॅक्स येथे समुद्रात स्थापित करण्यात येणार आहे.



हेही वाचा-

स्कॉर्पिअन वर्गातील तिसऱ्या आयएनएस करंज पाणबुडीचं जलावतरण

1000 नौसैनिकांचा 'आयएनएस विराट'वर विराट योगा!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा