Advertisement

शिक्षकांच्या विशेष रजेमुळे, विद्यार्थ्यांच्या सुट्टीवर गदा


शिक्षकांच्या विशेष रजेमुळे, विद्यार्थ्यांच्या सुट्टीवर गदा
SHARES

शिक्षक आणि शिक्षण संघटनांच्या बाबतीतलं सरकारचं धोरण काही केल्या कळत नाही. एकीकडे शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांना अनुदानासाठी आंदोलन करावं लागत आहे, तर दुसरीकडे शिक्षण विभाग काही शिक्षण संघटनांना वार्षिक अधिवेशनासाठी भर पगारी रजा  देत असल्याचं चित्र आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं झालेलं नुकसान त्यांना सुट्टीच्या कालावधीत भरून काढायचं आहे. त्यामुळे शिक्षकांच्या अधिवेशनाच्या सुट्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुट्टीवर गदा येणार आहे.


शिक्षकांना ९ ते ११ फेब्रुवारीपर्यंत भरपगारी रजा

मुंबईत दहिसर येथे १० ते ११ फेब्रुवारी दरम्यान शिक्षक परिषदेचे दोन दिवसांचे अधिवेशन होत आहे. यासाठी विशेष बाब म्हणून राज्यातील शिक्षकांना ९ ते ११ फेब्रुवारीपर्यंत भरपगारी रजा देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या अधिवेशनाला राज्यातील शिक्षकांना उपस्थित राहाता यावे, म्हणून महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान विशेष रजा मंजूर केली आहे. यासाठीचे एक पत्र शिक्षण विभागालाही पाठविण्यात आले आहे.


भरपगारी रजा

विशेष म्हणजे शिक्षक परिषदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना परिषदेकडून एक प्रमाणपत्र देण्यात येणार असून, त्याआधारे शाळेत भरपगारी रजा मिळणार आहे. तसेच सर्व शिक्षकांच्या भोजनाची व्यवस्था आणि दोन दिवस राहणाऱ्या शिक्षकाच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आलेय. दरम्यान या अधिवेशनामुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील अनेक शाळांच्या दैनंदिन कार्यक्रमावर परिणाम होण्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा