Advertisement

मुंबईकरांनो, फटाके 'या' वेळेतच उडवा, नाहीतर खावी लागेल तुरूंगाची हवा

न्यायालयाच्या या आदेशानुसार गृह विभागाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडवावेत, असा आदेश काढला आहे. तर यावेळेच्या आधी वा नंतर फटाके उडवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे संकेतही या आदेशाद्वारे दिले आहेत. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस ८ दिवस तुरूंगावास आणि दंड अशी शिक्षेची तरतूद असणार आहे.

मुंबईकरांनो, फटाके 'या' वेळेतच उडवा, नाहीतर खावी लागेल तुरूंगाची हवा
SHARES

देशभरात दिवाळीची धामधूम सुरू झाली असून मुंबईतही सर्वत्र उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. नवीन कपडे, फराळ आणि फटाक्यांची खरेदीही जोरात सुरू आहे. पण मुंबईकरांनो, यंदा एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. ती म्हणजे दिवाळीच्या दिवसांत केव्हाही नवे कपडे घाला, फराळ करा, परंतु फटाके मात्र सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या रात्री ८ ते १० या वेळेतच उडवा. कारण या आदेशाचं उल्लंघन केल्यास तुम्हाला तुरूंगाची हवा खावी लागेल ती देखील ८ दिवस सोबत दंडही भरावा लागेल.


फटाक्यांवर निर्बंध

ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण रोखण्यासाठी देशभरात फटाक्याचं उत्पादन, विक्री आणि फटाके वाजवण्यावर बंदी आणण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.


सशर्त परवानगी

पण, दिवाळी हा मोठा सण असल्याने फटाके उडवण्यास परवानगी द्यावी या विनंतीनुसार सर्वोच्च न्यायालयानं २ तास फटाके उडवण्यास सशर्त परवानगी दिली. तर तामिळनाडू सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारने फटाके उडवण्याचे २ तास ठरवावेत, असंही न्यायालयानं सांगितलं.


पोलिसांना सूचना

न्यायालयाच्या या आदेशानुसार गृह विभागाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडवावेत, असा आदेश काढला आहे. तर यावेळेच्या आधी वा नंतर फटाके उडवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे संकेतही या आदेशाद्वारे दिले आहेत. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस ८ दिवस तुरूंगावास आणि दंड अशी शिक्षेची तरतूद असणार आहे. गृह विभागाकडून पोलिस विभागासह प्रत्येक पोलिस अधिकाऱ्यांना यासंबंधीच्या सूचना केल्या असून कडक कारवाई करण्यासही सांगितलं आहे. तर बेकायदा फटाके विक्रीवर कडक नजर ठेवण्याचेही आदेश दिल्याची माहिती अमिताभ गुप्ता, प्रधान सचिव (विशेष गृह विभाग) यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली.



हेही वाचा-

मनसेकडून दिपोत्सवादरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन

दिवसभरात कुठलेही २ तास फोडा फटाके, सर्वोच्च न्यायालयाची मुभा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा