Advertisement

Mumbai Rains : मान्सून अपडेट्ससाठी YATRI अॅप ठरतय फायदेशीर

हे अॅप, जे पहिले अधिकृत लोकल रेल्वे अॅप आहे, पावसाळ्यात ट्रेनचे नियमित आणि वेळेवर लाइव्ह अपडेट देते.

Mumbai Rains : मान्सून अपडेट्ससाठी YATRI अॅप ठरतय फायदेशीर
SHARES

मुंबईत मुसळधार पावसामुळे दैनंदिन प्रवाशांना पुन्हा एकदा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचा प्रवास अनुभव सुलभ करण्यासाठी मध्य रेल्वेचे (CR) YATRI अॅप उपयोगी ठरत आहे. हे अॅप, जे पहिले अधिकृत लोकल रेल्वे अॅप आहे, पावसाळी ट्रॅकवरून धावणाऱ्या ट्रेनचे नियमित आणि वेळेवर लाइव्ह अपडेट देते.

मान्सूनमुळे उशीर झालेल्या किंवा रद्द झालेल्या गाड्यांची माहिती अॅपद्वारे प्रवाशांना दिली जाते. पावसामुळे मार्गात अडथळा आल्यास ते पर्यायी मार्ग आणि गाड्या सुचवते.

अॅपच्या विविध वैशिष्ट्यांद्वारे, मुंबईकर त्यांच्या प्रवासाचे पावसाळ्याती नियोजन करू शकतात आणि स्थानकांवर गर्दी टाळू शकतात. YATRI सर्व बातम्या, माहिती आणि घोषणा थेट रेल्वे नियंत्रण कक्षातून प्रशासित करते, त्यामुळे ते प्रत्येकासाठी फायदेशीर ठरत आहे. या प्रयत्नांमुळे प्रवाशांना पावसाळ्यात सोईस्कर जाते. 

YATRI अॅपची प्रमुख वैशिष्ट्ये:

1. थेट ट्रेन लोकेशन

2. पर्यायी मार्ग आणि गाड्या

3. अधिकृत घोषणा

4. स्मार्ट प्रवासाचे नियोजन

या अॅपमध्ये पावसाळ्याशी संबंधित अपडेट्स मिळण्यासाठी मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना यात्री अॅप डाउनलोड करण्याचे आवाहन केले आहे.

YATRI अॅप डाउनलोड करण्यासाठी, फक्त Google Play Store किंवा Apple App Store ला भेट द्या आणि "YATRI - तुमचा रेल्वे साथीदार" शोधा. या पावसाळ्यात माहिती मिळवा, पुढे योजना करा आणि YATRI अॅपसह प्रवास करा.



हेही वाचा

पुढचे 5 दिवस पावसाचेच, NDRF च्या 13 टीम तैनात

मुंबईत शुक्रवारीही रेड अलर्ट, बुधवारपासून पावसाचा जोर कायम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा