Advertisement

आचारसंहितेमुळं मांजरांची नसबंदी लांबणीवर

मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांनंतर १ एप्रिलपासून मांजरांचीही नसबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आचार संहिता लागू झाल्यानं मांजरांची नसबंदीचा उफक्रम थांबवण्यात आला आहे.

आचारसंहितेमुळं मांजरांची नसबंदी लांबणीवर
SHARES

मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांनंतर १ एप्रिलपासून मांजरांचीही नसबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आचारसंहिता लागू झाल्यानं मांजरांच्या नसबंदीचा उपक्रम थांबवण्यात आला आहे. मांजरांची नसबंदी करून प्राणी उत्पत्ती नियंत्रण योजना राबविण्यात येणार होती. तसंच, महापालिकेच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेला भारतीय पशुकल्याण मंडळानं देखील मंजुरी दिली होती. परंतु, आचारसंहितेमुळं माजरांची नसबंदी करण्याचा उपक्रम थांबवण्यात आला आहे.


१ कोटींची तरतूद

महापालिकेनं या उपक्रमासाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या उपक्रमाअंतर्गत मांजर पकडून आणणं, नसबंदीसाठी दाखल करणं व सोडणं यासाठी एकूण १२०० रुपये खर्च येणार आहे. त्याशिवाय मुंबईत डब्ल्यूएसटी, वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग, बॉम्बे एसपीसीए, आयडिया इंडिपेंडन्स ऑफ अ‍ॅनिमल्स, अहिंसा, मालाड, ‘उत्कर्ष सामाजिक संस्था अशा ठिकाणी मांजरांची नसबंदी केली जाणार आहे.


मांजरांचं प्रजनन जास्त

दरम्यान, श्वानांच्या तुलनेत मांजरांचं प्रजनन जास्त आहे. मांजरीचं प्रजनन वषार्तून चार वेळा होतं. तर श्वानाचं प्रजनन २ वेळा होतं. तसंच, भटकी मांजर ही एका वेळेस सरासरी २ ते ५ पिल्लांना जन्म देते. त्यामुळे रोगराई-दुर्गंधीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते.



हेही वाचा -

'उर्मिला यांना राजकारणातलं शून्य ज्ञान' – गोपाळ शेट्टी

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी ‘महामतदार जागृती’ अभियान



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा