Advertisement

पोलीस ठाण्याबाहेरच सांडपाण्याचे साम्राज्य


पोलीस ठाण्याबाहेरच सांडपाण्याचे साम्राज्य
SHARES

मानखुर्द - रस्ते, नाले आणि रेल्वे प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या हजारो झोपडीधारकांचे एमएमआरडीने मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाउंड परिसरात पुनर्वसन केले आहे. सध्या याठिकाणी दिडशेपेक्षा अधिक इमारती आहेत. मात्र या नागरिकांना पालिका अथवा एमएमआरडीएकडून कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही. त्यामुळे बाराही महिने या परिसरात सांडपाणी रस्त्यांवर वाहत असते. अशाच प्रकारे याच परिसरातील एका इमारतीमध्ये मानखूर्द पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याच्या इमारतीमधूनच अनेक सांडपाण्याचे पाईप तुटलेल्या अवस्थेत आहेत. परिणामी हे सर्व सांडपाणी पोलीस ठाण्याबाहेरच जमा होत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमणात दुर्गंधी पसरलेली आहे. याबाबत पालिका आणि एमएमआरडीला अनेक तक्रारी केल्या, मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती एका पोलीस शिपायाने दिली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा