Advertisement

बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर

बुधवारी आणि गुरुवारी चक्रीवादळाचा परिणाम म्हणून वेगाने वारे वाहतील.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर
SHARES

अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपोरजॉय चक्रीवादळ १५ जून रोजी सायंकाळी कराची ते गुजरात दरम्यानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

याच दरम्यान पुढील ४८ तासांत म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यात वेगवान वारे वाहतील आणि किरकोळ पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर अजूनही तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. हवामानात अनुकूल बदल होत असला तरीदेखील मान्सून पुढे सरकलेला नाही. 

पुढील दोन दिवसांत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता असून, तो १८ जूनच्या आसपास मुंबईत दाखल होईल.

चक्रीवादळ जसजसे पुढे सरकत आहे, तसतसे मुंबईतल्या हवामानात बदल होत आहे. बुधवारी आणि गुरुवारी चक्रीवादळाचा परिणाम म्हणून वेगाने वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ४५ किलोमीटर असेल आणि किरकोळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा