Advertisement

पालिका शाळांमधील खेळाडूंना ‘महापौर विद्यार्थी क्रीडा शिष्यवृत्ती’


पालिका शाळांमधील खेळाडूंना  ‘महापौर विद्यार्थी क्रीडा शिष्यवृत्ती’
SHARES

मुंबई महापालिका शाळांमधील मुले वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्येही प्राविण्य मिळवत आहेत.  क्रीडा क्षेत्रात आपलं आणि महापालिका शाळेचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या मुलांना आता महापौर विद्यार्थी क्रीडा शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विजेते ठरणाऱ्या महापालिका शाळांमधील खेळाडूंची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येणार आहे.


अशी मिळेल शिष्यवृत्ती

महापालिका प्राथमिक व माध्यमिक शालेय मुलांसाठी ‘महापौर विद्यार्थी क्रीडा शिष्यवृत्ती’ देण्याकरता  नियम, अटी, शर्ती, गुणांकन निकष व पध्दत निश्चित करण्यात अाली अाहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि राज्यस्तरावरील विजेते आणि सहभागी असलेल्या महापालिका शाळांमधील विद्यार्थी खेळाडूला ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम ते तृतीय क्रमांक आणि सहभागी असलेल्या खेळाडूची या महापौर विद्यार्थी क्रीडा शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येणार आहे. तर राज्यस्तरावरील विजेते व सहभागी खेळाडूंनी प्राविण्य मिळवल्यास त्यांना शिष्यवृत्ती आणि व्दितीय क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूला ८ हजार रुपये, तृतीय क्रमांक मिळवल्यास ६ हजार रुपये आणि सहभागी असलेल्या खेळाडूला ३ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.


शिष्यवृत्ती २०१८-१९ पासून 

महापालिका शिक्षण विभागातील माध्यमिक, प्राथमिक नगरबाह्य शाळा व मतिमंद शाळेतील मुलांनी मागील शैक्षणिक वर्ष व चालू शैक्षणिक वर्षात विविध वैयक्तिक व सांघिक खेळात शासनाच्या शालेय महासंघ,  विविध मान्यताप्राप्त असोशिएशन फेडरेशनशी सलग्न मान्यतेच्या क्रीडा स्पर्धामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभाग व पहिल्या तीन क्रमांकांमध्ये प्राविण्य संपादन केल्यास त्यांना २०१८-१९ पासून ‘महापौर विद्यार्थी क्रीडा शिष्यवृत्ती’ ची रक्कम देण्यात येणार आहे.

शिक्षण समितीपुढे प्रस्ताव

शिष्यवृत्तीची रक्कम इसीएसद्वारे करण्यात येणार असल्याचं शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी स्पष्ट केलंय. सन २०१७-१८पासून जी महापालिका शाळांमधील मुले क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेले असतील आणि महापौर क्रीडा शिष्यवृत्ती क्रीडा समितीने शिफारस केलेल्या मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिक्षण समितीपुढे हा प्रस्ताव मंजुरीला ठेवला असून या मंजूरीनंतर याची अंमलबजावणी केली जाईल.



हेही वाचा -

Exclusive: सोसायट्यांनो सावधान! अग्निरोधक यंत्रणा नादुरूस्त असल्यास वीज-पाणी कापणार

तरीही ५० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा