पालकमंत्री राणीच्या बागेत

 Mazagaon
पालकमंत्री राणीच्या बागेत
पालकमंत्री राणीच्या बागेत
पालकमंत्री राणीच्या बागेत
पालकमंत्री राणीच्या बागेत
See all

भायखळा - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचं आधुनिकीकरण करण्‍यात येत असून या कामांची राज्‍याचे उद्योगमंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी पाहणी केली. मंजूर प्राणीसंग्रहालयाच्‍या प्रवेशद्वाराजवळील एन्‍ट्री प्‍लाझा अंतर्गत बागा विकासाची कामं, हम्‍बोल्‍ट पेंग्विन सध्‍या ठेवण्‍यात आले आहेत ती विलगीकरण सुविधा (क्वारंटाईन एरिया), इंटरप्रिटेशन सेंटर इमारत आणि त्‍यामध्‍ये हम्‍बोल्‍ट पेंग्विन प्रदर्शनाकरता तयार करण्‍यात येत असलेले क्षेत्र ही कामं प्रत्‍यक्ष पाहणीप्रसंगी दाखवली. अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख यांनी पालकमंत्री देसाई यांना सर्व कामांची सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री देसाई यांनी या कामांच्‍या दर्जाबद्दल समाधान व्‍यक्‍त केलं. तसंच सर्व कामं विहित मुदतीत पूर्ण करण्‍याच्‍या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Loading Comments