Advertisement

लोकलमधील फेरीवाल्यांना विरोध

मुंबई उपनगरीय लोकलमध्ये फेरीवाल्यांना अधिकृत परवाने देण्याच्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या निर्णयाला उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे.

लोकलमधील फेरीवाल्यांना विरोध
SHARES

मुंबई (mumbai) उपनगरीय लोकलमध्ये फेरीवाल्यांना (hawkers) अधिकृत परवाने देण्याच्या मध्य रेल्वेच्या (central railway) मुंबई विभागाच्या निर्णयाला उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे.

हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणार असल्याचा दावा करत मंजूर केलेली निविदा तत्काळ रद्द करण्याची मागणी महासंघाने केली आहे.

महासंघाचे माजी अध्यक्ष व मध्य रेल्वे उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे माजी सदस्य मनोहर शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतचे निवेदन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय व्यवस्थापक तसेच वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक यांना सादर करण्यात आले आहे.

लोकल गाड्यांमध्ये सुमारे 100 अधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी भिवंडीतील (bhiwandi) एका ठेकेदार कंपनीला सुमारे दीड कोटी रुपयांचा ठेका देण्यात आल्याची माहिती आहे.

उपनगरीय लोकल प्रवास हा आधीच अत्यंत गर्दीचा आणि अल्प कालावधीचा असतो. त्यामुळे लोकलमध्ये (mumbai local) प्रवाशांसाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो.

अशा परिस्थितीत फेरीवाल्यांना अधिकृत प्रवेश देणे हे प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.

तसेच भविष्यात वाढणाऱ्या वातानुकूलित लोकल गाड्या आणि बंद दरवाजांच्या लोकलचा विचार करता फेरीवाल्यांचा वावर प्रवाशांसाठी अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यामुळे प्रवासी आणि फेरीवाले यांच्यात वाद वाढू शकतात, तसेच महिला प्रवाशांच्या सुरक्षेवरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती महासंघाने व्यक्त केली आहे.

महासंघाने स्पष्ट केले की, ज्या रेल्वे स्थानक परिसरात मोकळी जागा उपलब्ध आहे, तेथे महसूल वाढीसाठी व्यवसाय परवाने देण्यास कोणताही विरोध नाही.

मात्र चालत्या लोकल गाड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे फेरीवाले असू नयेत, अशी ठाम भूमिका महासंघाने मांडली आहे.



हेही वाचा

मध्य रेल्वेवर 168 स्पेशल ट्रेन धावणार

ओला आणि उबरला पर्याय म्हणून 'भारत टॅक्सी ॲप' लाँच


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा