बांद्रेकरवाडी ते प्रतापनगर भुयारी मार्ग

 Pali Hill
बांद्रेकरवाडी ते प्रतापनगर भुयारी मार्ग

मुंबई - पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील जोगेश्‍वरीत होणारे अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी लवकर बांद्रेकरवाडी ते प्रतापनगर असा भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. या भुयारी मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून शासनाकडून यास मंजुरी मिळाल्यानंतर तातडीनं काम सुरू करण्यात येईल, असं आश्‍वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृहनिर्माण, उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना दिले. जोगेश्‍वरीतील प्रलंबित विकास कामांबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोबत राज्यमंत्री वायकर यांनी सोमवारी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, विभागीय अभियंता, आर. के. पाटील, रस्ते विभागाचे अभियंता, कार्यकारी अभियंता, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष बाळा नर, एस.आर.पी.एफचे सहाय्यक पोलीस आयुक्त आदी उपस्थित होते.

Loading Comments