Advertisement

मंत्रालय ते विधान भवन दरम्यान भुयारी मार्गाचा प्रस्ताव

मंत्रालय ते विधान भवन दरम्यान लवकरच भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रालय ते विधान भवन दरम्यान भुयारी मार्गाचा प्रस्ताव
SHARES

मंत्रालय ते विधान भवन दरम्यान लवकरच भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मान्यता देण्यात आली आहे.  

कर्मचाऱ्यांची मागणी

मंत्रालय, विधान भवन तसंच नवीन प्रशासन भवन इमारतीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध कामासाठी एकमेकांच्या विभागात सातत्याने ये-जा करावी लागते. परंतु मंत्रालयातून विधान भवन किंवा नवीन प्रशासन भवनाच्या इमारतीत जायचं असल्यास वर्दळीचा रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे या तिन्ही इमारतींदरम्यान एखादा भुयारी मार्ग असावा, अशी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती. 

समितीत मान्यता

खासकरून २०१२ मध्ये मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला आग लागल्यानंतर मंत्रालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासह पुन्हा भुयारी मार्गाचा विषय देखील पुढे आला होता. तेव्हा या विषयाकडे गांभीर्याने पाहण्यात आलं नव्हतं. मात्र हा विषय पुन्हा नव्याने समोर आला आहे. त्यानुसार मंत्रालय ते नवीन प्रशासन भवन व पुढे विधान भवनापर्यंत भुयारी मार्गाचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत आल्यावर या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या समितीत सार्वजनिक बांधकाम, नियोजन व वित्त विभागाच्या सचिवांचा समावेश आहे.  

निधीची तरतूद

मुंबईत १७ जूनपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात विस्तारित अर्थसंकल्पात मांडण्यात येणार असून त्यात प्रस्तावित भुयारी मार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. 



हेही वाचा-

पराभूत अशोक चव्हाण देणार प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

अंधेरीत चुलत भावाची गोळ्या झाडून हत्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा