Advertisement

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न, आठवड्याभरातील दुसरी घटना

प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचं कारण देत एका व्यक्तीने शुक्रवारी सकाळच्या सुमारास मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न, आठवड्याभरातील दुसरी घटना
SHARES

प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचं कारण देत एका व्यक्तीने शुक्रवारी सकाळच्या सुमारास मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे.

सुभाष जाधव असं या व्यक्तीचं नाव असून तो पुण्यातील आंबेगाव येथील रहिवासी आहे. गावातील जमीन आणि घर बळकवाल्याच्या वादातून या व्यक्तीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. स्थानिक प्रशासनाकडे न्याय मागूनही दखल घेतली जात नसल्याने नैराश्येतून या व्यक्तीने हे कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा- घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ

या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब या व्यक्तीला ताब्यात घेतलं. तोपर्यंत त्याने विष प्राशन केलेलं असल्याने त्याला रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अवघ्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली आहे.

याआधी १५ ऑगस्ट रोजी एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री मंत्रालयातील ध्वजारोहण करून बाहेर पडल्यानंतर मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून या शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुनील गुजर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. गुजर जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. आर्थिक अडचणीमुळे त्रस्त झाल्याने आत्महदनाचा प्रयत्न केल्याची माहिती गुजर याने पोलिसांना दिली होती.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा