मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील प्राण्यांच्या सेवेसाठी असलेल्या सुपर स्पेशालिटी प्राणी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले आहे. या सुपर स्पेशालिटी रुग्णाहिकेचा फायदा प्राण्यांना होणार आहे. याची मागणी अनेक वर्षांपासून प्राणी प्रेमी करत होते. ती मागणी आता पूर्ण झाली आहे.
'समस्त महाजन' या संस्थेच्या अर्हम अनुकंपा प्रोजेक्टअंतर्गत सुरू करण्यात आलेली ही प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज रुग्णवाहिका मुंबई, ठाणे, आणि पालघर या भागांतील गोमाता आणि इतर जखमी प्राण्यांवर उपचार करणार आहे.
समाजातील विविध गोशाळांमधील जखमी, आजारी गायी आणि इतर प्राण्यांना दवाखान्यात नेण्यासाठी हायड्रोलिक रुग्णावाहिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. प्राणीमात्रांचे दुःख दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे.
‘समस्त महाजन' ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून प्राणी कल्याण, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेकडून मोफत प्राणी उपचार, आहार वाटप, वृक्षारोपण, तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत अशी विविध कार्ये नियमितपणे केली जात आहेत. संस्थेच्या वतीने आतापर्यंत गोमाता आणि इतर अशा 92,500 जखमी प्राण्यांवर मागील 36 महिन्यांत उपचार करण्यात आले आहे.
ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनल/इंडिया (HSI/इंडिया) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी 2024 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, मुंबईतील रस्त्यांवर सुमारे 91,000 सामुदायिक प्राणी राहतात. गेल्या दशकात नसबंदी मोहिमेमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या 4,400 पेक्षा जास्त कमी झाली असली तरी, कुत्रे आणि वाढत्या भटक्या मांजरींच्या संख्येसाठी संरचित वैद्यकीय सेवा अजूनही दुर्मिळ आहे.
हेही वाचा