Advertisement

परमबीर सिंह यांना झटका, याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

न्यायालयाने सुनवाणीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असताना त्यांना पक्षकार का केलं नाही? अशी विचारणा केली.

परमबीर सिंह यांना झटका, याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
SHARES

सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मोठा झटका दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरौधात परमबीर सिंह यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करुन घेण्यास नकार देत उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केला आहे. अनिल देशमुख यांची खंडणी आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशी करावी तसंच आपली गृहरक्षक दलात केलेली बदली अन्यायकारक असून ती रद्द केली जावी, अशी मागणी करणारी याचिका परमवीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. 

न्या. संजय किशन कौल आणि न्या. आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे. न्यायालयाने सुनवाणीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असताना त्यांना पक्षकार का केलं नाही? अशी विचारणा केली. तसंच यावेळी त्यांनी ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांना सीबीआय चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात का जात नाही? अशी विचारणा केली. 

माजी मुंबई पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्याचं यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात का गेला नाहीत अशी विचारणा केल्यानंतर मुकूल रोहतगी यांनी आजच उच्च न्यायालयात अर्ज करु अशी माहिती दिली.



हेही वाचा -

  1. वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये १४२ टक्के वाढ


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा