वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या

या बदल्यांत गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सचिन वाझे यांच्या सीआययु युनिटचे एपीआय रियाझुद्दीन काझी व प्रकाश होवाळ यांचीही बदली करण्यात आली आहे.

वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या
SHARES

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेलं स्फोटकांचं प्रकरणी, मनसुख हिरेन मृत्यू, सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना झालेली अटक, त्यानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी आणि पाठोपाठ परमबीर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबई पोलीस दलातील तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

या बदल्यांत गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सचिन वाझे यांच्या सीआययु युनिटचे एपीआय रियाझुद्दीन काझी व प्रकाश होवाळ यांचीही बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आल्यानंतर हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आता ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये फक्त क्राईम ब्रांचच्या ६५ अधिकाऱ्यांचा समावेश असून पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसंच अनेक अधिकाऱ्यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे.

मुंबईतील सर्व युनीट प्रमुखांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सीआययू युनिटचे एपीआय रियजुद्दीन काझी यांना सशस्त्र पोलीस दलात पाठवण्यात आलंय. तर सीआययू युनिटचे एपीआय प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

गुन्हे शाखेत जास्त कालावधी काढलेल्या अधिकाऱ्यांना हटविण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी सचिन वाझे प्रकरणामुळेच या बदल्या करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाशी काहीच संबंध नसतानाही बदलीचा फटका बसल्याने पोलिसांमध्ये नाराजी आहे. 



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये १४२ टक्के वाढ

  1. राज्यात मंगळवारी १३२ रुग्णांचा मृत्यू, २८,६९९ नवे रुग्ण
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा