कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती उठवली

सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पासाठी समुद्रात टाकण्यात येणाऱ्या भरावाच्या कामासह इतर कामांना दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उठवली. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून रखडलेले कोस्टल रोडचे काम मुंबई महापालिकेला पुन्हा सुरु करता येईल.

SHARE

भर न टाकण्याची अट

उच्च न्यायालयाने कोस्टल रोड प्रकल्पासाठी समुद्रात टाकण्यात येणाऱ्या भरावाच्या कामासह इतर कामांस दिलेली स्थगिती उठवण्यास २३ एप्रिल रोजी नकार दिल्यावर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत सर्वोच्च न्यालयाच्या खंडपीठाने समुद्रात भर न टाकण्याच्या अटीवर महापालिकेला या कामासाठी हिरवा कंदील दिला.

इतर सुनावण्या जूनमध्ये

हे बांधकाम थांबवून ठेवणं जनहिताच्या दृष्टीने योग्य नाही. या प्रकल्पाविरोधातील इतर सुनावण्या जून महिन्यात होणार असल्याने महापालिकेला बांधकाम सुरु करायचं असल्यास त्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर सुरु करावं, असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. त्यामुळे महापालिकेला पावसाळ्याआधीच कोस्टल रोडचं काम सुरु करता येणार आहे.

मुंबईतील वाढत्या वाहतूककोंडीवर मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) चांगला उपाय आहे. मुंबईतील रहिवाशांना भेडसावणाऱ्या अपुऱ्या पायाभूत सुविधांच्या समस्येवरील कोस्टल रोड हा उत्तम पर्याय आहे, असं मुंबई महापालिकेने न्यालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटलं आहे.हेही वाचा-

'कोस्टल रोडचं काम जैसे थे' ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश

कोस्टल रोडचं काम सुरूच राहणार; स्थगितीस न्यायालयाचा नकारसंबंधित विषय
ताज्या बातम्या