सुलभ शौचालय बंद झाल्‍यानं गैरसोय

 Andheri
सुलभ शौचालय बंद झाल्‍यानं गैरसोय

अंधेरी पूर्व - येथील नवीन नागरदास मार्गावर पाालिकेच्‍या के पूर्व विभागामार्फत्‍ा पर्जन्‍यजलवाहिनी सुधारणेचं काम 15 डिसेंबरपासून हाती घेण्यात आलंय. हे काम 13 जानेवरीपर्यंत्‍ा चालण्‍ाार आहे. मात्र हे काम सुरू झाल्यापासून या मार्गावरील पादचारी पुलाखाली असलेलं एकमेव सुलभ शौचालय बंद झालंय. त्यामुळे सर्वसामान्‍यांच्‍ो हाल होत आहेत. येथील फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवून सुलभ शौचालयाकडे जाणारा मार्ग मोकळा करावा, तसंच सुलभ शौचालय लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी होत आहे.

Loading Comments