Advertisement

वसईच्या भुईगावात आढळली संशयास्पद बोट, सुरक्षा यंत्रणा सतर्क

वसईच्या भुईगाव समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

वसईच्या भुईगावात आढळली संशयास्पद बोट, सुरक्षा यंत्रणा सतर्क
SHARES

वसईच्या भुईगाव समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस आणि तटरक्षक दलामार्फत बोटीची पाहणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिवसभर ही बोट कुणाची आहे आणि का इथे आली? याची माहिती मिळाली नसल्यानं सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क कऱण्यात आलं आहे.

ही बोट समुद्र किनार्‍यापासून दोन नॉटीकल मैल आतमध्ये आहे. बोटीवर कसलाच झेंडा किंवा निशाण नाही. याबाबत वसई पोलिसांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी सुरू केली.

समुद्रकिनार्‍यावर गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक संशयास्पद बोट स्थानिकांना दिसली. या भागात बोटींचा वावर नसतो. पण अचानक ही बोट स्थानिक मच्छिमारांना दिसली. त्यामुळे याबद्दल संशय निर्माण झाला आहे.

पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍याच्या मदतीनं बोटीवरील तपासणी करण्याचा प्रयत्न केला मात्र बोटीत कुणी आढळून आलं नाही. त्यामुळे तटरक्षक दल आणि महाराष्ट्र सागरी किनारा मंडळाच्या (महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड) ची मदत घेण्यात आली आहे. ही बोट संशयास्पद असून आम्ही ड्रोनच्या मदतीनं हवाई पाहणी केली. परंतु अद्याप बोटीबद्दल माहिती मिळाली नसल्याचं परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी सांगितलं.

आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही सर्व यंत्रणांचा सतर्क केलं आहे. अंधार झाल्यानं बोटीची पाहणी करण्याचं काम शुक्रवारी सकाळी केलं जाईल, असं बंदर निरीक्षक बी.जी. राठोड यांनी सांगितलं. दरम्यान, बोटीबाबत संदिग्धता असल्यानं खबरदारी म्हणून सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क कऱण्यात आलं आहे.



हेही वाचा

कल्पिता पिंपळेंच्या बोटांची शस्त्रक्रिया यशस्वी, दोन्ही बोटे जोडण्यात यश

विनामास्क कारवाईवेळी बीएमसी मार्शलला कार चालकानं बोनेटवरुन फरफटत नेलं

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा