Advertisement

राज्यभर दूधकोंडी आंदोलनाला सुरुवात, गोकुळचं दूध संकलन बंद


राज्यभर दूधकोंडी आंदोलनाला सुरुवात, गोकुळचं दूध संकलन बंद
SHARES

दूधाला योग्य हमीभाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध'कोंडी' आंदोलनाला राज्यभर सुरुवात झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे गोकुळचं दूध संकलन बंद झालं. जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेनेही या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

दुधाला प्रति लिटर 5 रुपये दरवाढ देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीनं पुकारलेल्या या दूधकोंडी आंदोलनाला रविवारी मध्यरात्री पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर सुरुवात झाली. या दूधकोंडी आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटले. यावेळी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी शेतकरी संघटनेने दुधाचे टँकर अडवले. 


...तर कारवाई

या आंदोलनात मुंबईचं दूध रोखत सरकारला वेठीस धरण्याचं शेट्टींचं लक्ष आहे. त्यानुसार राज्यासह मुंबईत कुठल्याही मार्गे दूध येऊ देणार नसल्याचं प्रयत्न स्वाभिमानीच्या कार्यकर्ते करणार आहेत. पण राज्य सरकारनं मात्र आता पुढं येत मुंबईकरांना कोणत्याही परिस्थितीत दूध कमी पडू देणार नाही असं स्पष्ट केलं आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मुंबईला दूध कमी पडू दिलं जाणार नाही. तसंच कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिलं आहे.


या मागणीसाठी आंदोलन

दूध उत्पादनासाठी प्रति लिटर ३५ रुपये खर्च येतो. मात्र दूध उत्पादकांना प्रत्यक्षात प्रति लिटरमागे फक्त १७ रुपये इतका भाव मिळतो. त्यामुळं दूध उत्पादकांचं मोठ नुकसान होतं. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याचवेळी दुधाला प्रति लिटर २७ रुपये दर देण्याचा अध्यादेश राज्य सरकारनं काढला आहे. पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी काही होताना दिसत नाही. सरकारकडं यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही सरकार ढिम्म आहे, या ढिम्म सरकारला जागं करण्यासाठीच  16 जुलैला दूधकोंडी आंदोलन करण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी येंनी दिला होता. 


हेही वाचा -

मुंबईला दूध कमी पडू देणार नाही- महादेव जानकर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा