स्वच्छतेचा असाही संदेश

अंधेरी - नाताळ म्हटलं की आपल्याला आठवतो सांताक्लॉज. वेगवेगळे गिफ्ट देणारा सांताक्लॉजनं अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकावर चक्क स्वच्छतेचे धडे दिलेत. महानगरपालिकेच्या विभाग के पश्चिमच्या घनकचरा विभाग आणि क्लिनअप मार्शल्स यांनी हे स्वच्छता अभियान राबवलं. नाताळचं औचित्य साधून सांताक्लॉजच्या वेशभूषेतील मनपा कर्मचाऱ्यांनी स्वच्छ मुंबई सुंदर मुंबईचा संदेश दिला.

Loading Comments