Advertisement

देशात स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईला तिसरं स्थान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वच्छतेबाबतच्या 'स्वच्छ सर्वेक्षण-२०२०' च्या निकालांची घोषणा केली. देशात मध्य प्रदेशातील इंदूर हे सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे.

देशात स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईला तिसरं स्थान
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वच्छतेबाबतच्या 'स्वच्छ सर्वेक्षण-२०२०' च्या निकालांची घोषणा केली. देशात मध्य प्रदेशातील इंदूर हे सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे.  इंदूरने सलग चौथ्या वर्षी स्वच्छ शहर म्हणून अव्वल स्थान मिळवलं आहे.

पहिल्या १० शहरांत राज्यातून केवळ नवी मुंबईचा समावेश झाला आहे. देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने तिसरं स्थान पटकावलं आहे. पुण्याला २०२० च्या सर्वेक्षणात १५ वं स्थान प्राप्त झालं आहे. तर नाशिक आणि ठाणे अनुक्रमे ११ व्या आणि १४ व्या स्थानावर, तर नागपूर १८ व्या क्रमांकावर आहे.


देशाच्या नागरिकांचा स्वच्छतेबाबत सहभाग वाढवण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या २८ दिवसांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२० पूर्ण करण्यात आलं आहे.  स्वच्छता सर्वेक्षणाच्या पहिल्याच वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताव मैसूर या शहराने पटकावला होता. त्यानतर सतत तीन वर्षे म्हणजेच २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर हे शहर देशात सर्वात स्वच्छ शहर ठरले होते.



हेही वाचा -

मुंबईतील अनेक रुग्णालयं होणार नॉनकोविड

मोडक सागर पाठोपाठ 'ही' तलावं ओव्हरफ्लो होण्याची शक्यता




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा