Advertisement

कचरा उचलणाऱ्या कामगारांचं आंदोलन


कचरा उचलणाऱ्या कामगारांचं आंदोलन
SHARES

मुंबई - विक्रोळी , पवई , नाहूर , भांडुप परिसरात कचरा उचलणाऱ्या पालिकेच्या कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन केले आहे. या मुळे या संपूर्ण विभागात कचराच कचरा दिसतो आहे. या कामगारांना दिवाळी बोनस आणि इतर थकबाकी न मिळाल्याने जवळपास १५० कामगारांनी कामबंद आंदोलन केलं. पालिकेनं दत्तक वस्ती योजनेअंर्तगत काही संस्थांना कचरा उचलण्याची कंत्राटे दिली आहेत. पालिका या संस्थांना वेळेत त्याचा मोबदला देखील देते परंतु या संस्था त्यांच्या कंत्राटी कामगारांना पगार देत नाही. दिवाळी सणात मिळणारा बोनस देखील न मिळाल्यानं कामगारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. विक्रोळी टागोर नगर पालिका चौकी समोर कामबंद आंदोलन करण्यातआलं. तर, हा संस्था आणि त्यांच्या कामगारांचा विषय आहे आमचा नाही, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर कामगारांनी केलेल्या कामबंद आंदोलनाचा फटका इथल्या नागरिकांना बसलाय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा