Advertisement

संततधार पावसामुळं 'हे' धरण भरण्याची शक्यता


संततधार पावसामुळं 'हे' धरण भरण्याची शक्यता
SHARES

मुंबईत मागील आठवड्यापासून तुफान पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं मुंबईत पुरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झालं. परंतू, असं असलं तरी, मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळं मुंबईकरांचं पाणी संकट कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय काही तलावांची पातळी भरली असल्यानं तलावाजवळील परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे.

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे ठाणे जिल्ह्यातील तानसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. यामुळं तानसा धरण लवकरच भरुन वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन या तानसा नदी काठावरील ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३३ गावांना सावधानतेचा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. पावसाच्या या कालावधीत धरणाखालील नदी पात्रात न जाण्याचं सूचित करण्यात आले आहे.

सध्या या तानसा धरणाची पातळी १२५.५५ मि टिएचडी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मिटर्स टीएचडी इतकी निश्चित केलेली आहे. या तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत आहे. याकडे लक्ष केंद्रीत करून तानसा धरण लवकरच भरुन वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नदी पात्रातील पाण्यात न उतरण्याच्या सूचना देऊन सावधानतेचा इशारा या तानसा नदी काठावरील गावांना दिला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील १८ गावे व पालघर जिल्ह्यातील १५ गांवांना सावधानतेचा इशारा आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा