Advertisement

पाण्याची चिंता नको! मोडकसागर पाठोपाठ तानसाही भरले!


पाण्याची चिंता नको! मोडकसागर पाठोपाठ तानसाही भरले!
SHARES

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडकसागर धरणापाठोपाठ तानसा तलावही ओसंडून वाहू लागला आहे. मंगळवारी संध्याकाळी तानसा तलाव भरला असून त्यानंतर या तलावाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. जुलै महिन्यातच दोन तलाव भरल्यामुळे मुंबईकरांसाठी ही मोठी खूशखबर ठरणार आहे!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेल्या तसेच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी तानसा तलाव हा एक तलाव आहे. या तलावातून दरदिवशी ४०० दशलक्ष (40 कोटी)लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो. मंगळवारी १८ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ४.५५ मिनिटांनी हा तलाव पूर्णपणे भरला.

मागील वर्षी तानसा तलाव २ ऑगस्ट, २०१६ रोजी पहाटे २ वाजून १० मिनिटांनी भरुन वाहू लागला होता. परंतु, यंदा १४ दिवसांपूर्वीच हा तलाव भरला आहे. मुंबईला मोडकसागर, तानसा, भातसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा व अप्पर वैतरणा या सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या धरणांची पाणी साठवणूक क्षमता ही एकूण १ लाख ४४ हजार कोटी लिटर एवढी असून त्या तुलनेत १८ जुलैपर्यंत १ लाख ०२ हजार ८४२ कोटी लिटर एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.


तलाव-धरणपातळी (मीटर)सध्याची पातळी (मीटर)

दररोजचा पाणीसाठा(द. लि.)

अप्पर वैतरणा
603.51
599.79
 1080
मोडकसागर
163.15
163.16
-----
तानसा
128.63
128.63
400
मध्य वैतरणा
285.00
282.67
300
भातसा
142.07
131.34
2012
विहार
80.12
139.17
77.45
136.89
90
18
तुळशी





हेही वाचा

24 तास पाणी? छे..हे तर दिवास्वप्न!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा