Advertisement

कॅन्सरग्रस्तांसाठी नवी आशा..'नव्या'!


कॅन्सरग्रस्तांसाठी नवी आशा..'नव्या'!
SHARES

कर्करोगग्रस्तांना उपचारासाठी ऑनलाईन वैद्यकीय सल्ला आणि उपचार देण्यासाठी टाटा मेमोरिअल रुग्णालयातर्फे ‘नव्या’हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाला जगभरातल्या कर्करोग रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या 3 वर्षांत मुंबईसह देशभरातून जवळपास 10 हजार रुग्णांनी या ऑनलाईन सेवेचा लाभ घेतला आहे. या निमित्ताने जुलै 2016 ते मार्च 2017 या कालावधीत टाटा रुग्णालयातर्फे 22 शहरांमधील एक हजार कर्करुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले.

यात जवळपास 90 टक्के रुग्णांनी ऑनलाईन सेवेचा फायदा घेतल्याचे समोर आले आहे. तर, 73 टक्के रुग्णांनी ‘नव्या’द्वारे तज्ज्ञांनी दिलेला सल्ला हा आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत शेअर केला आहे आणि 78 टक्के रुग्णांनी ‘नव्या’च्या तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्याची माहिती 'नॅशनल कॅन्सर ग्रीड' या उपक्रमाचे समन्वयक डॉ. सी. एस. परेश यांनी दिली.

परळचे टाटा रुग्णालय कर्करोगासाठी प्रसिद्ध रुग्णालय असल्याकारणाने अनेक ठिकाणांहून येथे रुग्ण उपचारासाठी येतात. पण, त्यांचा येण्या-जाण्याचा त्रास कमी व्हावा, या दृष्टीने त्यांच्याच शहरात त्यांना वैद्यकीय उपचाराचा सल्ला मिळावा, याकरता मे 2014 मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाईन सल्ला देण्याची सुविधा सुरु करण्यात आली. त्यानंतर टाटा रुग्णालयाने ‘नव्या’ या स्वयंसेवी संस्थेसोबत हातमिळवणी केली.

फक्त दारिद्र्य रेषेखालील रुग्णांनाच ही सुविधा मोफत आहे. पण, परदेशी रुग्णांना मात्र 6 हजार रुपये एवढे शुल्क आकारले जाते. रुग्णांना ऑनलाईन वैद्यकीय सल्ला घेताना दारिद्र्य रेषेखालील असल्याचे 37 कागदोपत्री पुरावे अपलोड करावे लागतील.

गीतिका श्रीवास्तव, 'नव्या' नेटवर्कच्या संस्थापक

ऑनलाईन सल्ल्यासाठी काय कराल?

रुग्णांना कर्करोगतज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी www.navya.care या वेबसाईटवर लॉग इन करावे लागते. त्यानंतर रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबियांना आधी सुरू असलेल्या डॉक्टरांकडे केलेले सर्व वैद्यकीय रिपोर्ट टाटा रुग्णालयाच्या वेबसाईटवर अपलोड करावे लागतील. यानंतर 'नव्या' नेटवर्क आणि टाटाचे तज्ज्ञ डॉक्टर या अहवालावर चर्चा करून उपचारांसाठी संबंधित रुग्णाला तज्ज्ञांचा सल्ला देतील. यामुळे रुग्णांच्या पैशांसह वेळेचीही बचत होणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा