Advertisement

७ दिवसांत थकबाकी भरा, मगच होईल मुंबई मॅरेथाॅन!


७ दिवसांत थकबाकी भरा, मगच होईल मुंबई मॅरेथाॅन!
SHARES

देशातील प्रसिद्ध अशा मुंबई मॅरथॉनला महापालिकेच्या 'ए' वॉर्ड तर्फे थकबाकी भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. २०१७ ची राहिलेल्या थकबाकीचे पैसे भरा तेव्हाच २०१८ च्या 'टाटा मॅरेथॉन'साठी परवानगी दिली जाईल, अशी नोटीस बुधवारी 'ए' वॉर्डचे उपआयुक्त किरण दिघावकर यांनी मुंबई मॅरथॉनच्या आयोजकांना बजावली आहे.


किती आहे थकबाकी?

२०१७ च्या सुरूवातीला आयोजित मुंबई मॅरेथॉनने जागेचे भाडे तसेच जाहिरातीसाठी वापलेल्या होर्डिंगची २ कोटी ७४ लाख १५ हजार ३०५ इतकी रक्कम महापालिकेला भरलेली नव्हती तसेच गेल्यावर्षी 'गेट वे ऑफ इंडिया' जवळ घेण्यात आलेल्या कार्यंक्रमाचे २१ हजार रुपयांचे शुल्कही भरलेले नाहीत. त्यामुळे महापालिकेतर्फे ही नोटीस बजावण्यात आली आहे.


७ दिवासांत थकबाकी भरा

त्यामुळे यंदा प्रतिष्ठेची समजली जाणारी टाटा मॅरेथॉन होणार का नाही? यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही थकबाकी रक्कम येत्या ७ दिवसांत भरण्याची सूचना देखील मुंबई मॅरथॉनच्या ओयजकांना करण्यात आली आहे.


गेल्या वर्षीही वाद

मुंबई मॅरथॉन ही अशियातील टॉप १० मधील एक प्रतिष्ठेची मॅरेथॉन आहे. यामध्ये देशातून तसेच जगभरातून स्पर्धक सहभागी होत असातात. गेल्यावर्षी देखील या मॅरेथॉनमध्ये अडचण निर्माण झाली होती, यंदाही देखील पैसे न भरल्यामुळे २०१८ जानेवारी मधील मॅरेथॉनला परवानगी देणार नसल्याचे नोटीसमध्ये बजावले आहे.



हेही वाचा-

मुंबई मॅरेथॉनचे प्रायोजकत्व टाटा समुहाकडे

'इथं' कुत्री चावण्यासाठी नव्हे, तर जिंकण्यासाठी धावतात!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा