Advertisement

'इथं' कुत्री चावण्यासाठी नव्हे, तर जिंकण्यासाठी धावतात!

मुंबईत एक अनोखी स्पर्धा भरते जिथे असंख्य पाळीव कुत्री शिस्तबद्धरितीने धावतात. पण यावेळी त्यांच्यापुढं टार्गेट असतं ते स्पर्धा जिंकण्याचं. ती देखील साधीसुधी स्पर्धा नव्हे, तर मॅरेथाॅन स्पर्धा. रविवार ५ नोव्हेंबरला साई सेलिब्रेशन संस्थेतर्फे वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए ग्राऊंडवर १ मैल अंतराच्या 'पेटथाॅन' स्पर्धेचं आयाोजन करण्यात आलं होतं.

'इथं' कुत्री चावण्यासाठी नव्हे, तर जिंकण्यासाठी धावतात!
SHARES

एरवी रात्रीच्या वेळेस गाड्यांच्या मागे धावणारी कुत्री आपण पाहिली असतील. एखाद्याला चावण्याचं टार्गेट ठेवल्यासारखं मागे धावणारी ही कुत्री पाहून कुणाचीही घाबरगुंडी उडेल. पण मुंबईत अशी एक अनोखी स्पर्धा भरते जिथे असंख्य पाळीव कुत्री शिस्तबद्धरितीने धावतात. पण यावेळी त्यांच्यापुढं टार्गेट असतं ते स्पर्धा जिंकण्याचं. ती देखील साधीसुधी स्पर्धा नव्हे, तर मॅरेथाॅन स्पर्धा. रविवार ५ नोव्हेंबरला साई सेलिब्रेशन संस्थेतर्फे वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए ग्राऊंडवर १ मैल अंतराच्या 'पेटथाॅन' स्पर्धेचं आयाेजन करण्यात आलं होतं.




स्पर्धा कशासाठी ?

वैयक्तिक फिटनेससोबत प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून प्रबोधन व्हावं म्हणून 'साई सेलिब्रेशन रन' नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ८० हून अधिक विविध जातींचे श्वान सहभागी झाले होते. तर श्वानमालक, प्राणीप्रेमी संस्था आणि फिटनेसचं महत्त्व ओळखणाऱ्या २ हजारांहून अधिक जण स्पर्धेला उपस्थित होते.



कशी होती स्पर्धा?

५ किमी, १० किमी, १५ किमी आणि १ किमी अंतराचं सेलिब्रेशन रन अशा कॅटेगिरीज या स्पर्धेत होत्या. अभिनेत्री गुल पनाग हिने या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. तर, अभिनेता टायगर श्राॅफ या स्पर्धेला खास सेलिब्रिटी म्हणून उपस्थित होता.



फिटनेसच्या बाबतीत मी पहिल्यापासूनच पॅशनेट आहे. मी अभिनय क्षेत्रात आहे म्हणून नव्हे, तर मला व्यायाम करताना खरोखरच मनापासून आनंद मिळतो. त्यामुळेच या स्पर्धेला मी उपस्थित राहिलो आहे.

- टायगर श्राॅफ, अभिनेता


कुणी जिंकली स्पर्धा

सचिन पटेल यांनी १५ किमीच्या मॅरेथॉनमध्ये ५१.३६ मिनिटांची नोंद करत प्रथम क्रमांक पटकावला. श्वानांच्या १ किमी मॅरेथॉनमध्ये ग्रेट डेन जातीच्या 'टायसन' या श्वानाने ही स्पर्धा जिंकली. विजेत्या स्पर्धकांना टायगर श्रॉफच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.



सेलिब्रेशन रन म्हणजे काय?

सेलिब्रेशन रन 'अॅथलेटीक फेडरेशन आॅफ इंडिया'शी नोंदणीकृत असून ही स्पर्धा इतर उच्च दर्जाच्या रनिंग इव्हेंटसारखीच नावाजली जाते. गेल्या वर्षापासून साई इस्टेट कन्सल्टन्ट, चेंबूर, प्रा.लि. (एसईसीसीपीएल) यांच्यामार्फत ही स्पर्धा आयोजित केली जाते.



हेही वाचा-

तळवळकरांच्या क्लासिकल शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी 20 लाखांचे बक्षीस

पाच वर्षांचा जीव..पण त्याचे स्टंट थरकाप उडवतात!



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा