‘रेप्टाइल्स ऑफ द नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स’ या जैवविविधता मालिकेतील तिसरं पुस्तक टाटा पॉवरनं ईला फाऊंडेशनच्या सहयोगानं सोमवारी प्रकाशीत केलं आहे. हे पुस्तक म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या १२३ सुंदर व सर्वाधिक धोक्यातील प्रजातींचं संकलन आहे. पश्चिम घाटातील जैवविविधता टिकवून ठेवण्यात या प्रजातींचं योगदान मोठं आहे.
जगातील सर्वांत महत्त्वाच्या जैवविविधता केंद्रांपैकी एक असलेल्या पश्चिम घाटातील साप, मगरी, कासवे, पाली, सरडे यांच्या प्रजातींविषयीच्या माहितीचं संकलन या पुस्तकामध्ये करण्यात आलं आहे. पश्चिम घाटाच्या उत्तर भागात गेल्या अनेक वर्षांपासून जतन करण्यात आलेल्या या जैवविविधतेच्या समृद्धीची माहिती या पुस्तकातून मिळते. या पुस्तकाचं प्रकाशन कंपनीच्या पारेषण व वितरण विभागाचे अध्यक्ष मिनेश दवे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी पुस्तकाचे सहलेखक व पर्यावरणवादी आणि ईला फाऊंडेशनचे संचालक डॉ. सतीश पांडे तसंच टाटा पॉवरमधील विभागाचे हेड इस्टेट विवेक विश्वासराव उपस्थित होते.
हेही वाचा -
नोकरीच्या बहाण्याने तरूणांची फसवणूक, आरोपींकडून लाखोंची रोकड हस्तगत